ETV Bharat / briefs

लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे अंगणवाडी मदतनीस म्हणून सेवेत रुजू - duty join

प्रहार जनशक्ती पक्षाकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे वैशाली येडे यांनी

वैशाली येडे
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:24 AM IST

यवतमाळ - प्रहार जनशक्ती पक्षाकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविलेल्या वैशाली सुधाकर येडे यांनी आज त्यांच्या कळंब तालुक्यातील राजूर येथील अंगणवाडीमध्ये रुजू होऊन कामास सुरुवात केली आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या येथे कार्यरत होत्या.

दरम्यान, प्रहारकडून शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती. वैशाली येडे या प्रहारकडून उमेदवारी मिळाल्यावर विना मानधन रजेवर होत्या. या काळात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्यांनी शिट्टी या चिंन्हावर निवडणूक लढवली होती. यांच्या या उमेदवारीमुळे युती-आघाडीच्या उमेदवार यांचे विजयाचे समीकरण बिघडवले आहे.

११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम निवडणूक आटोपली आणि त्यानंतर वैशाली येडे या पुन्हा एकदा परत सेवेत अंगणवाडी मदतनीस म्हणून रुजू झाल्या आहेत.

आज आपल्या गावातील अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांनी हाती झाडू घेतला आणि संपूर्ण अंगणवाडी स्वच्छ केली. त्यानंतर चिमुकल्या मुलांच्या देखभालीत व्यस्त झाल्या. ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका आणि त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.

Intro:लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे
अंगणवाडी मदतनीस म्हणून सेवेत रुजूBody:यवतमाळ : प्रहार जनशक्ती पक्षाकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविलेल्या वैशालि सुधाकर येडे यांनी आज त्यांच्या कळंब तालुक्यातील राजूर येथील अंगणवाडी मध्ये रुजू होऊन कामास सुरवात केली आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या येथे कार्यरत होत्या. दरम्यान प्रहार कडून शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती. वैशाली येडे ह्या प्रहरच्या उमेदवारी मिळाल्यावर विना मानधन रजेवर होत्या. या काळात त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. त्यांनी शिट्टी या चिंन्हवर निवडणूक लढवली होती. यांच्या या उमेदवारीमुळे युती-आघाडीच्या उमेदवार यांचे विजयाचे समीकरण बिघडविले आहे. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम निवडणूक आटोपली.आणि वैशाली येडे ह्या पुन्हा एकदा परत सेवेत अंगणवाडी मदतनीस म्हणून रुजू झाल्या आहे. आज आपल्या गावातील राजूरच्या अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांनी हाती झाडू घेतला आणि संपूर्ण अंगणवाडी स्वच्छ केली. त्यानंतर चिमुकल्या मुलांच्या देखभालीत व्यस्त झाल्या. त्यांचा कामावर रुजू झाल्यानंतर अंगणवाडी मध्ये स्वच्छता करतानाचा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे.
९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका आणि त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाकडून लोकसभेचे उमेदवारी मिळाल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.