ETV Bharat / briefs

धक्कादायक! हिंगोलीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचेच पळविले मंगळसूत्र - Lady police mangalsutra stolen vasmat news

पिटलेवाड याा नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून नांदेड मार्गे जात होत्या. दरम्यान, एका दुचाकी स्वाराने त्यांच्या गळ्यातील 46 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडुन चोरट्यांने पळ काढला.

Police station vasmat city
पोलीस ठाणे वसमत शहर
author img

By

Published : May 7, 2021, 9:22 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात काही केल्या चोरीच्या घटना कमी होत नाही आहेत. चोरट्यांनी हद्दच ओलांडली असून, चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून तोडून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री 8च्या सुमारास घडली. अंबिका पिटलेवाड असे गंठण चोरी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पिटलेवाड या नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून नांदेड मार्गे जात होत्या. दरम्यान, एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील 46 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडुन चोरट्यांने पळ काढला. त्यामुळे घाबरलेल्या पितलेवाड यांनी वसमत शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

शोध मोहीम सुरू -

या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यामुळे वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सपोनि श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक खार्डे, जमादार प्रशांत मुंडे आदींनी त्या दुचाकीस्वरांचा शोध सुरू केला होता मात्र रात्रभर शोध मोहीम राबवून ही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे गुरुवारी याप्रकरणी पिटलेवाड यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.