ETV Bharat / briefs

वेदनेने तडफडणाऱ्या रसेलला रबाडाचा मदतीचा हात

author img

By

Published : Apr 13, 2019, 7:06 PM IST

रबाडाने वेदनेने तडफडणाऱ्या रसेलच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस केली

कंगिसो रबाडा आणि आंद्रे रसेल

कोलकाता - आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाता संघास ७ गडी राखून धूळ चारली. या सामन्यात रोमांचक क्षण पाहायला मिळाले. यातच एक अशीही घटना घडली, ज्यात रबाडाने सर्वांचे हृदय जिंकले गेले.

मैदानावर दव पडल्याने सामन्यात कांगिसो रबाडाच्या हातून एक चेंडू निसटला आणि आंद्रे रसेलच्या मांडीवर लागला. त्यामुळे रसेल मैदानावर कोसळला. तो दुखापतीने कळवलाही. यानंतर रबाडाने वेदनेने तडफडणाऱ्या रसेलच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस केली आणि मदतीसाठी हात पुढे केला. आंद्रे रसेल रबाडाचा हात पकडून उभा राहिला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला.

कोलकात्याने चार सामने जिंकले आहेत. त्यात ३ सामन्यात रसेलने सामनावीरचा किताब मिळविला आहे. कालच्या सामन्यातही त्याने २१ चेंडूत ४५ धावांची स्फोटक फलंदाजी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पुढच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.