हैदराबाद - आयपीएल २०१९ चा किताब जिंकण्यासाठी मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढत रंगणार आहे. दोन्ही संघाना किताबाचा चौकार मारण्याची संधी आहे. हा किताब जिंकणाऱ्या संघावर पैशाचा पाऊस पडणार आहे.
आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या संघास २० कोटी रुपये मिळणार आहे. तर उपविजेत्या संघास १२.५ कोटी रुपये मिळणार आहे. दुसरा क्वॉलिफायर सामना हारणारा संघ दिल्ली कॅपिटल्स संघास १०.५ कोटी रुपये मिळतील. चौथ्या क्रमांकाचा हैदराबादच्या संघास ८.५ कोटी रुपये मिळणार आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूस ऑरेंज कॅप आणि सर्वात जास्त गडी बाद करणाऱ्या खेळाडूस पर्पल कॅप मिळणार आहे. याचसोबत दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये मिळतील.
इमर्जिंक प्लेयर अवॉर्ड खेळाडूस १० लाख रुपये बक्षीस मिळेल. हा किताब त्याच खेळाडूला मिळतो ज्याचा जन्म १९९३ नंतर झाला आहे आणि ज्याने ५ पेक्षा कमी कसोटी आणि २० एकदिवसीय सामने आणि २५ पेक्षा कमी सामने खेळलेला असावा. मागील वर्षी हा किताब ऋषभ पंतला देण्यात आला.