ETV Bharat / briefs

पाकिस्तानचा संघ होईल विश्वविजेता; निवड समितीचा दावा

पाकच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल-हक यांना इंग्लंडमधील विश्वचषक कोण जिंकणार असे विचारल्यावर त्यांनी पाकच्या संघाचे नाव घेऊन साऱ्यांनाच चकित केले.

author img

By

Published : Apr 9, 2019, 9:38 PM IST

इंजमाम उल-हक

लाहोर - नुकतेच यूएईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानच्या संघाचा दारुण पराभव झाला. पाकने ही मालिका ५-०ने गमावली. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकच्या संघावर चौफेर टीका होत आहे. मात्र, निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल-हक हे संघाची पाठराखण करत आहेत.

inzamam ul haq
इंजमाम उल-हक

पाकच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल-हक यांना इंग्लंडमधील विश्वचषक कोण जिंकणार असे विचारल्यावर त्यांनी पाकच्या संघाचे नाव घेऊन साऱ्यांनाच चकित केले.

इंजमाम म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आम्ही प्रमुख ७ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. ज्यात कर्णधार सर्फराज अहमदचाही समावेश आहे. तरीही आम्ही या मालिकेत चांगला खेळ केला. मला विश्वास आहे की येणाऱ्या विश्वचषकासाठी आम्ही असा संघ निवडू जो पाकला विजयी करून देईल.

सध्या पाकचा संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. १९९२ नंतर या संघाला आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक जिंकता आला नाही.

Intro:Body:

SPO 01

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.