ETV Bharat / briefs

टीम इंडियासाठी खुशखबर! केदार जाधव फिट

author img

By

Published : May 18, 2019, 11:12 AM IST

केदार जाधव अनफिट झाल्यास त्याच्या जागी ऋषभ पंतला घेण्याची मागणी पुढे येत होती. केदार जाधव फिट झाल्याने विश्वकरंडकात खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पंतला अजून वाट बघावी लागणार आहे.

केदार जाधव

मुंबई - इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वकरंडकासाठी भारतीय संघ २२ मे रोजी सकाळी इंग्लंडला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर आली आहे. बेस्ट फिनिशर केदार जाधव याला फिट घोषित करण्यात आले आहे.

दुखापत झाल्यानंतर केदार जाधव भारतीय संघाचे फिजियो पॅट्रिक फरहत यांच्या देखरेखेखाली होता. मागील दोन आठवड्यांपासून तो मुंबईत उपचार घेत होता. गुरुवारी सकाळी फरहत यांनी बीसीसीआयला जाधवचे रिपोर्ट पाठविले होते. त्यानंतर आज बीसीसीआयने त्याला फिट घोषित केले.

मधल्या फळीत फलंदाजी करणारा ३४ वर्षीय केदार जाधवला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. पंजाब विरुद्धच्या सामन्यात थ्रो करताना ही दुखापत झाली होती. त्यामुळे विश्वकरंडकात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होता. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकात तो भारतीय संघात खेळणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.