ETV Bharat / briefs

संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी इन्सिडेंट कमांडरच्या नेमणुका

नेमणुका करण्यात आलेले इन्सिडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाच्या ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थानच्या सोबत राहणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करून पादुकांचा मार्ग निश्चित करावा व या पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहोचतील याबाबत योग्य ते नियोजन करणे, हे त्यांचे काम असेल.

Collector naval kishor ram
Collector naval kishor ram
author img

By

Published : Jun 27, 2020, 6:04 PM IST

पुणे - आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी या वर्षी प्रातिनिधिक स्वरुपात काही संतांच्या पादुका, ज्या परंपरेने विठ्ठल रुक्मिणी भेटीस जातात त्यांना मर्यादित स्वरुपात आणि केवळ संतांच्या पादुका एसटीद्वारे किंवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी (30 जून 2020) दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 4 देवस्थानांच्या पालख्या संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सिडेंट कमांडरच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, श्री संत चांगवटेश्वर देवस्थान या चार पालख्या पंढरपुरला जाणार आहेत. त्यासाठी सदर व्यवस्था करण्यात येत आहे. दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखीसोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरिकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

नेमणुका करण्यात आलेले इन्सिडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाच्या ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करून पादुकांचा मार्ग निश्चित करावा व या पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहोचतील याबाबत योग्य ते नियोजन करणे, हे त्यांचे काम असेल.

प्रवासादरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, 2 व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच या पादुकांचे प्रस्थान झाल्यापासून ते पंढरपूर येथे पोहोचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाच्या ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहोचतील याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.