ETV Bharat / briefs

धुळे : बेकायदेशीररित्या साठवलेला धान्यसाठा जप्त, शिरपूर तालुक्यातील कारवाई - शासकीय रेशनचे धान्य दुकान धुळे बातमी

शिरपूर तालुक्यातील मौजे मालकातर या गावात शासकीय रेशनच्या दुकानात धान्यांचा वाटपाबाबत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. या प्रकरणी पथकाने संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकानात छापा टाकत दुकानदाराने स्वत:च्या घरात बेकायदेशिररित्या साठवून ठेवलेले शासकीय रेशनचे धान्य जप्त केले.

बेकायदेशीररित्या साठवलेला धान्य साठा जप्त

author img

By

Published : Jun 11, 2020, 6:23 PM IST

धुळे - जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील मौजे मालकातर येथील स्वस्त धान्य दुकानदार गैरव्यवहार करीत असल्याच्या तक्रारी बऱ्याच दिवसापासून जिल्हा प्रशासनास प्राप्त होत होत्या. या प्रकरणी, पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अचानक छापा टाकला. यावेळी, गहू व तांदळाचा जास्तीचा साठा आढळून आला. या कारवाईत संबंधित स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा व बेकायदेशिररित्या स्वत:च्या घरात शासकीय रेशनचे धान्य साठवून ठेवणारा पदम पाडका पावरा व रविंद्र विक्रम पावरा यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिरपूर तालुक्यातील मौजे मालकातर हे गाव मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने धान्यांचा वाटपाबाबत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे सदर भागातील धान्य वाटपावर जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष होते. मौजे मालकातर येथील पदम पाडका पावरा यांचे घरामध्ये रेशनचे धान्य साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी, रमेश मिसाळ, पुरवठा कार्यालयातील कर्मचारी विवेक घुगे व पुरवठा निरीक्षक शिरपूर, अपर्णा वडुरकर यांच्या पथकाने सदर स्थळी अचानक छापा टाकला. यावेळी तेथे उपस्थित पदम पाडका पावरा याने त्याच्या घरातील धान्यसाठा दाखवला. मात्र, शासकीय गोदामातून देण्यात आलेला धान्यसाठा व प्रत्यक्ष साठा याचा ताळमेळ मिळून आला नाही. पदम पावरा याने रविंद्र विक्रम पावरा याच्या घरामध्ये उर्वरीत धान्य असल्याचे सांगितले आणि पथकाने त्याची मोजदाद केली.

शिरपूर शासकीय गोदामातून एकुण 72.50 क्विंटल गहू दिलेला असताना प्रत्यक्षात 13.50 क्विंटल गहू जास्तीचा आढळून आला. तसेच शासकीय गोदामातून कोणत्याही योजनेचे तांदूळ देण्यात आलेले नसताना 19 क्विंटल तांदूळ संबंधित ठिकाणी आढळून आले. जास्तीचे धान्य हे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवले असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या दोन्ही व्यक्तींकडे धान्य साठवणूक करण्याबाबत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी अथवा नोकरनामा नाही. याबाबत संबंधित स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा याला वारंवार दुरध्वनी करुनही तो उपस्थित राहिला नाही. तसेच साठा नोंदवही व विक्री नोंदवही इत्यादी उपलब्धही करुन दिले नाही. सदर दुकानदाराने लाभार्थ्यांना 35 किलो ऐवजी 10 किलो धान्य दिल्याचे लाभार्थ्यांनी जबाब नोंदविले आहे. या प्रकरणी तिन्ही व्यक्तीविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे यांच्या आदेशान्वये मायानंद भामरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, शिरपूर यांनी याबाबत रितसर फिर्याद पोलीस ठाणेसांगवी, येथे दाखल केली आहे. तर, जिल्ह्यात अशाप्रकारे शासकीय धान्यांची बेकायदेशीर साठवणूक अथवा वाहतूक करुन कोणी काळाबाजार करीत असेल तर याबाबत जिल्हा प्रशासनास माहिती द्यावी. अशा व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुध्द प्रसंगी मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.