कोलकाता - चेन्नई सुपर किंग्ज संघातील दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज विकेट घेताच सीमारेषेकडे धावत आनंद व्यक्त करत असतो. हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. इम्रान ताहिरच्या जल्लेषासंदर्भात आयसीसीने ट्विटरवर त्याची खिल्ली उडविणारा एक व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओत एक माणूस खूप वेगाने धावत आहे.
रविवारी कोलकात्याविरुद्ध झालेल्या सामन्यात ताहिरने आंद्रे रसेलचा बळी घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला. तो वेगाने पळत सुटला आणि आनंद साजरा करू लागला. या जल्लोषावर आयसीसीने जीआयएफ व्हिडिओ टाकला आहे.
इम्रान ताहिरने वेगवेगळ्या संघाकडून आयपीएलमधून ४६ सामने खेळले आहेत. त्याने ४६ सामन्यात ६६ गडी बाद केले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने १३ बळी घेतले आहेत. सध्या तो पर्पल कॅपचा मानकरीही आहे.