ETV Bharat / briefs

पत्नीचा गळा चिरून खून, तर पतीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न - नांदेडात पत्नीची हत्या

आज (गुरुवार) पहाटे शहरातील स्वामी विवेकानंद नगरामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला गळा चिरुन हत्या केली. तर पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे
author img

By

Published : Sep 24, 2020, 7:30 PM IST

नांदेड : शहरातील स्वामी विवेकानंद नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका महिलेचा पतीने गळा चिरून खून केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी पतीनेही स्वतः विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

स्वामी विवेकानंद नगरातील रहिवाशी आरोपी वसंत माधवराव पोटजाळे (५८) हा सार्वजनिक बांधकाम विभागात चौकीदार म्हणून काम करतो. त्याने गुरुवारी पहाटे त्याची पत्नी ज्योती पोटजाळे (३०) हिचा तिक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला. त्यानंतर आरोपी पतीने स्वतः ही विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन आरोपीला ताब्यात घेतले असून त्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.