ETV Bharat / briefs

इंदू मिलमधील डॉ. आंबडेकरांच्या पुतळ्याची उंची आता 100 फुटांनी वाढली - Dr. Ambedkar statue height Indu mill

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, त्याची उंची सध्या 350 फूट इतकी होती. ही उंची 100 फुटांनी वाढवण्याची मागणी अखेर आज मान्य करण्यात आली. त्यानुसार आता चबुतरा 100 फूट आणि पुतळा 350 फूट असा असणार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar statue
Dr. Babasaheb Ambedkar statue
author img

By

Published : Jul 7, 2020, 9:51 PM IST

मुंबई- दादर येथील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची आता 100 फुटांनी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता पुतळ्याची उंची एकूण 450 फूट अशी झाली आहे. आज झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 149 व्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यावेळी अन्य प्रकल्पही मंजूर करत एमएमआरच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नगर विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार पडली. मुंबई आणि एमएमआरमधील मेट्रो स्थानक आणि आसपासच्या बांधकामास जोडण्यासाठी मार्ग बांधण्यास यावेळी परवानगी देण्यात आली. तर एमएमआरमध्ये अग्निशमन सेवा स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचवेळी माथेरान येथे फिनिक्युलर रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी, धारावी निसर्ग उद्यान येथे 500 मीटरचा झुलता पादचारी पूल आणि इतर प्रकल्पासही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, त्याची उंची सध्या 350 फूट इतकी होती. ही उंची 100 फुटांनी वाढवण्याची मागणी अखेर आज मान्य करण्यात आली. त्यानुसार आता चबुतरा 100 फूट आणि पुतळा 350 फूट असा असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.