ETV Bharat / briefs

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी - गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी बातमी

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून या काळात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

प्रवेशबंदी
प्रवेशबंदी
author img

By

Published : Aug 11, 2020, 5:28 PM IST

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दूध, पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरण आणि रस्ता दुरुस्ती कामकाजासाठी साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही.

गणेशोत्सव म्हटले की चाकरमानी हमखास कोकणात येतातच, त्यामुळे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा महामार्गावरून वाहनांची वर्दळ असते. मात्र, यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळेच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्या नियमांचं पालन करून सध्या चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, अवजड वाहनांमुळे वाहतूक ठप्प होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीनुसार अवजड वाहनांना या कालावधीमध्ये पनवेल ते सावंतवाडी दरम्यान प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

अवजड वाहनांना बंदी कधीपासून कधीपर्यंत

1) 10 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 08.00 वाजेपासून ते 12 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8, या कालावधीत मुंबई - गोवा महामार्गावर 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

2) 19 ऑगस्ट 2020 रोजी 01 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार

3) 28 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 08 वाजल्यापासून ते 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 08 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

4) 01 सप्टेंबर 2020 ते 02 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.