नवी दिल्ली - भारतरत्न सचिन तेंडुलकरने २४ वर्षाच्या करिअरमध्ये असे काही विक्रम प्रस्थापित केले आहेत ते मोडणे जगातील कोणत्याही खेळाडूंसाठी एक अग्निपरीक्षाच असेल. विराट कोहली सचिनचे काही विक्रम मोडू शकतो, अशी आशा प्रत्येकांना वाटत आहे. सचिनचे असे काही विक्रम आहेत जे कुणालाही मोडणे अशक्य आहे. त्या विक्रमांवर एक नजर टाकूया.
- १०० आतंरराष्ट्रीय शतक
सचिन तेंडुलकरने त्याच्या करिअरमध्ये शंभर शतके पूर्ण केली आहेत. ज्यात ५१ कसोटी आणि ४९ एकदिवसीय शतकांचा समावेश होता. ३० वर्षीय विराटने आतापर्यंत ६६ शतके झळकावली आहेत. ज्यात २५ कसोटी आणि ४१ एकदिवसीय शतकांचा समावेश आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक मोडणे खूपच मुश्किल आहे.
- कसोटीतल्या धावा
सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने १५ हजार,९२१ धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूला हा टप्पा गाठणे अवघड आहे.
- २०० कसोटी सामने
सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने सर्वाधिक २०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते, सचिनेचे काही विक्रम मोडले जातील पण २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मोडणे जवळ जवळ असंभव आहे.
- ६ विश्वचषक
सचिनने ६ वेळा विश्वचषक स्पर्धेत खेळला आहे. सचिन शिवाय पाकिस्तानचे जावेद मियांदाद हेदेखील ६ वेळा विश्वचषक स्पर्धेत खेळले आहे. याशिवाय १५ क्रिकेटपटूंनी ५ वेळा विश्वचषकात सहभागी झाले आहेत.
- ३४ हजार आंतरराष्ट्रीय धावा
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. धावांच्या बाबतीत त्याच्या आसपासही कुणी नाही. श्रीलंकेचा कुमार संगाकाराने २८ हजार ०१६ धावा केल्या. या विक्रमांजवळ पोहचणे जवळ जवळ असंभव वाटते