ETV Bharat / briefs

गडचिरोलीच्या कोरोनाबाधित रुग्णाचा हैदराबादमध्ये मृत्यू - गडचिरोली कोरोना अपडेट

कोरोनामुळे मृत पावलेला रुग्ण हा सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथील मूळ रहिवासी आहे. त्याला 12 वर्षांपासून ह्र्दयविकाराचा आजार होता. त्यावरील उपचारासाठी तो हैदराबाद येथील उस्मानिया रुग्णालयात उपचारासाठी जात होता. काही दिवसांपूर्वी तो चंद्रपूरला गेला होता. तेथून तो हैदराबादला गेला. तेथे 31 मे ला तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले.

gadchiroli corona news
Gadchiroli corona patient dies in Hyderabad
author img

By

Published : Jun 2, 2020, 9:59 PM IST

गडचिरोली - सिरोंचा तालुक्यातील रुग्णाचा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे काल (सोमवारी) संध्याकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच या रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या रूग्णाच्या मृत्यूमुळे गडचिरोली जिल्ह्यात पहिला कोरोना बळी गेल्याची नोंद झाली आहे. मात्र, त्या व्यक्तीला जिल्ह्याबाहेर कोरोनाची लागण झाल्याची माहिती गडचिरोली आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनामुळे मृत पावलेला रूग्ण हा सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथील मूळ रहिवासी आहे. त्याला 12 वर्षांपासून ह्रदयविकाराचा आजार होता. त्यावरील उपचारासाठी तो हैदराबाद येथील उस्मानिया रूग्णालयात उपचारासाठी जात होता. काही दिवसांपूर्वी तो चंद्रपूरला गेला होता. तेथून तो हैदराबादला गेला. तेथे 31 मे ला तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले. त्यानंतर उस्मानिया रूग्णालयाने त्याला कोरोनाचा रुग्ण असलेल्या हैदराबाद येथील महात्मा गांधी रग्णालयात रवाना केले. तेथेही तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची खात्री झाली. तेव्हापासून त्याच्यावर याचठिकाणी उपचार सुरू होते.

मंगळवारी सकाळी साडे सहा वाजता या रुग्णाचे निधन झाल्याचे महात्मा गांधी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना कळविले. विशेष म्हणजे हैदराबाद येथून परत आल्यानंतर रुग्णाची पत्नी सिरोंचा येथे विलगीकरणात आहे. त्यामुळे ती अंत्यसंस्काराला जाऊ शकत नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार हैदराबाद येथेच करण्याविषयीचे पत्र रुग्णाच्या पत्नीने रूग्णालयाच्या व्यवस्थापनाला दिल्याची माहिती गडचिरोली जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

या रुग्णाला चंद्रपूर येथे कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हयातील त्याच्या बारा तासातील वास्तव्यादरम्यानच्या तीनही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी रविवार पासूनच आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध पूर्ण झाला असून दिडशेहून अधिक लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.