वाशिम - दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसून येत आहे. कारंजा येथील ४ जणांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये दोन २४ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष आणि ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. हे सर्वजण अमरावती येथे १२ जून रोजी कोरोनाबाधित आढळून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 52 रुग्ण बाधित संख्या झाली असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 43 अॅक्टिव रुग्णावर उपचार सुरू आहेत. कारंजा तालुक्यात आता कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 13 वर जावून पोहोचली आहे. ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पाच दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पर राज्य, इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांनी कोणाच्याही संपर्कात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.