ETV Bharat / briefs

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालव्यांअभावी धरणप्रकल्पे कुचकामी - Canal construction Sindhudurg

जिल्ह्यात एक मोठा आणि तीन मध्यम प्रकल्प असे मोठा पाणीसाठा होणारे चार प्रकल्प आहेत. एका एका प्रकल्पांची चार हजार ते पाच हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनक्षमता आहे. त्यामुळे या चार प्रकल्पाचे कालवे पूर्ण झाले असते तर जिल्ह्यातील सुमारे 20 हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले असते, परंतु यातील कोणत्याच प्रकल्पाचे कालवे पूर्ण झालेले नाहीत.

Sindhudurg canal construction
Sindhudurg canal construction
author img

By

Published : Jul 26, 2020, 7:56 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पूर्ण झालेल्या अनेक धरण प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये क्षमतेनुसार पाणीसाठा होत आहे. परंतु हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविणाऱ्या कालव्यांची कामे हाती न घेतल्याने धरणातील पाणी वाया जात आहे. कालव्यांअभावी जिल्ह्याची सिंचनक्षमता देखील खुंटली आहे. त्यामुळे आता धरणांपेक्षा कालवे पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गात एक मोठा, तीन मध्यम आणि 28 लघू, असे सिंचनाचे एकूण 32 प्रकल्प आहेत. तिलारीचा (ता. दोडामार्ग) मोठा प्रकल्प पर्णू झाला आहे, तर कुर्ली घोणसरी (ता. वैभववाडी-कणकवली), कोर्ले सातेंडी (ता. देवगड) आणि अरुणा (ता. वैभववाडी) हे तीन मध्यम प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यातील अरुणा प्रकल्पाची घळभरणी मे 2019 मध्ये झाली. उर्वरित दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे 15 ते 20 वर्षांचा कालावधी लोटला आहे. शिवाय जिल्ह्यातील 28 लघू प्रकल्पांच्या निर्माणाला देखील अनेक वर्षे झालेली आहेत. मात्र कालव्यांअभावी प्रकल्पातील पाणी वाया जात आहे.

जिल्ह्यात एक मोठा आणि तीन मध्यम प्रकल्प असे मोठा पाणीसाठा होणारे हे चार प्रकल्प आहेत. एका एका प्रकल्पांची चार हजार ते पाच हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनक्षमता आहे. त्यामुळे या चार प्रकल्पाचे कालवे पूर्ण झाले असते तर जिल्ह्यातील सुमारे 20 हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले असते, परंतु यातील कोणत्याच प्रकल्पाचे कालवे पूर्ण झालेले नाहीत. जिल्ह्याची सध्याची सिंचनाबद्दलची स्थिती अतिशय बिकट आहे. धरणालगत दीड, दोन किलोमीटर पर्यंतच कालव्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. या कालव्यांलगतच्या शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळते. उर्वरित पाणी हे नदीला सोडून दिले जाते. एकीकडे पाणी नाही म्हणून शेतकरी तळमळत असताना कोट्यावधी रुपये खर्चून साठा केलेले पाणी मात्र कालवे नसल्यामुळे वाया जात असल्याचे जिल्ह्यात चित्र पाहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.