मुंबई - पाश्चात्य राष्ट्रातील रॅप संस्कृतीचं दर्शन काही दिवसांपूर्वी एका गल्ली बॉय चित्रपटाचा माध्यमातून घडलं. रॅप सर्वानाच त्यामुळे आवडू लागलं. त्यामध्येच रॅप ही संस्कृती दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यामुळेच आता काही रॅपर आपल्या गाण्यातुन प्रचार करताना दिसत आहेत.
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे आहेत. अशातच अनेक पक्षांच्या प्रचार सभा, भाषणांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांपर्यंतही पोहचवले जात आहेत. मात्र यापैकी सध्या सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो धारावीमधील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचावर दोन तरुणांनी प्रचारासाठी रॅप साँग बनवले आहे.
या धारावीत राहणाऱ्या जाफर व यमराज या दोन नवख्या रॅपरसने शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचावर गाणं बनवलं आहे आणि या रॅप साँग द्वारे दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे हे चांगले उमेदवार आहेत. तसेच त्यांनी आपल्या पाच वर्षात काय काय काम केली, ते या गाण्याचा माध्यमातुन लोकांना पटवून देण्याचे काम ते करत आहेत व राहुल शेवाळे यांनाच मत देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र हे आवाहन करताना ते पक्षाचे निवडणूक चिन्ह वैगरे काही घेत नाही आपल्या रॅप संस्कृतीत असणारे कपडे स्टाईल कॅच करत गाण्यात एकापाठोपाठ एकदा अनेकवेळा राहुल शेवाळे असा उच्चार करताना दिसत आहे.
या त्यांचा प्रचाराचा व्हिडीओ गाणं ते सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल करणार आहेत,असे त्यांनी सांगितले.
हे दोन तरुण धारावी मध्ये राहतात काही दिवसांपूर्वी राहुल शेवाळे यांनी धारावीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात या तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी संधी देण्यात आली होती. तेव्हा त्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर एक गीत सादर केलं होतं. त्यामुळेच राहुल शेवाळे यांनी आपल्या प्रचारासाठी यंदा त्यांनी लिहलेलं गाणं सादर करायला सांगितले आहे. प्रामाणिकपणे आम्ही त्यांनी केलेल्या कामावर व विकासावर व भविष्यातील दूर दृष्टीकोण दिसत आहे. त्यामुळेच आम्ही आमचा रॅप संस्कृतीद्वारे लोकांना राहुल शेवाळे यांना मत द्या व त्यांनी केलेल्या कामाविषयी गाण्यातून जनजागृती करतोय.लोकांचा ही चांगला प्रतिसाद मिळतोय, असे जाफर आणि यमराज यांनी सांगितले.