नवी दिल्ली - आयपीएलमध्ये आज फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात दिल्लीने बंगळुरूपुढे विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीने शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकाच्या जोरावार निर्धारित २० षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात १८७ धावा केल्या.
दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ १८ धावांवर स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी तुफानी फटकेबाजी केली. शिखरने ३७ चेंडूत ५० तर श्रेयस अय्यरने ३७ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या दोन षटकात रुदरफोर्ड आणि अक्षर पटेल यांनी फटकेबाजी केली. त्या दोघांनी प्रत्येकी २८ आणि १६ धावा कुटल्या.
बंगळुरूकडून उमेश यादव, वॉशिग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. युझवेंद्र चहल ४१ धावा देत २ गडी बाद केले.