गोंदिया - विनयभंग प्रकरणात कारागृहात असलेले भाजप आमदार चरण वाघमारे यांची अखेर बुधवारी पाचव्या दिवशी सुटका झाली. मंगळवारीच त्यांना 5 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, काल कागदपत्रे कारागृहात पोहोचवण्यासाठी विलंब झाल्याने त्यांची सुटका झाली नव्हती. त्यामुळे आज सकाळी दहा वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा - आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांचे रोजगारासाठी परप्रांतात पलायन
मी पूर्वीपासूनच जामीन घेण्यास नकार दिला होता. मात्र, कारागृहात असताना वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करावे आणि जामीन अर्जावर स्वाक्षरी केली, असे कारागृहातून निघताच त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. निवडणुकीत अपक्ष लढण्याची तुमची तयारी आहे का? असे विचारले असता, कार्यकर्त्यांचे मत विचारून त्यांची इच्छा असेल तर अपक्षही निवडणूक लढवू, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
पक्षाने तिकीट दिली तर पक्ष्याच्या तिकिटावर आणि नाही दिले तर अपक्ष लढण्याची तयारी पुन्हा बोलावून दाखविली. आज भाजपची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. या यादीत जर नाव नसल्यास त्यांची पुढील भूमिका काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सकाळी सुटका होणार हे माहीत होताच कारागृह परिसरात त्यांचे कुंटुंबीय आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते.