मोहाली - तुफान फॉर्मात असलेला सनरायजर्स हैदराबादच्या संघातील सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पंजाब संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी करत नवा विक्रम केला आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या सोमवारच्या सामन्यात त्याने ६२ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारसह नाबाद ७० धावांची खेळी केली. त्याचे हे यंदाच्या आयपीएलमधील चौथे अर्धशतक ठरले. हा सामना हैदराबादने ६ गडी राखून जिंकला.
डेव्हिड वॉर्नरने मोहालीच्या आयएस ब्रिंदा स्टेडियमवर चौथे अर्धशतक ठोकले आहे. यापूर्वी त्याने ७०*, ५१,५२,५८ अश्या धावा केल्या आहेत. किंग्ज इलेव्हन संघाविरुद्ध सलग सातवे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने पंजाबविरुद्ध ५८, ८१, ५९, ५२, ७०, ५१, ७० अशा धावा कुटल्या आहेत.
आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके ठोकणारे खेळाडू
- अर्धशतके खेळाडू विरुद्ध संघ वर्ष
- ७ डेव्हिड वॉर्नर बंगळुरू २०१४ -१६
- ७ डेव्हिड वॉर्नर पंजाब २०१५-१९
- ४ ख्रिस गेल पंजाब २०१२-१३
- ४ जोस बटलर पंजाब २०१७-१९