ETV Bharat / briefs

विश्वकरंडकासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार - शोएब अख्तर

शोएबच्या मते, भारतीय संघ खूपच मजबूत आहे. विश्वकरंडकासाठी भारतीय संघ दोन वर्षांपूर्वीच तयार झाला आहे.

author img

By

Published : May 17, 2019, 1:25 PM IST

भारतीय संघ

लाहोर - आयसीसी विश्वचषक सुरू होण्याला काही दिवसांचा अवधी उरला आहे. प्रत्येक संघ चांगली तयारी करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे क्रिकेट समीक्षक मात्र, विश्वचषक कोण जिंकणार याचे भाकीत करत आहेत. पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने भारतच यावेळी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे.

शोएबच्या मते, भारतीय संघ खूपच मजबूत आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ दोन वर्षापूर्वीच तयार झाला आहे. विश्वचषक मोठी स्पर्धा असून, ती दीर्घकाळ चालते. त्यामुळे फिटनेसचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. भारतीय गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराहवर असणार आहे.

सामन्यातील पहिल्या आणि शेवटच्या षटकात तो निर्णायक ठरणार आहे. तो भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवू शकतो. पण त्यासाठी फिटनेस खूप महत्वाचा असल्याचे शोएबने सांगितले आहे.

शोएबचा विराटला सल्ला

भारतीय फलंदाजीविषयी बोलताना शोएब म्हणाला, की भारतीय फलंदाजीची चर्चा केवळ भारतातच होते असे नाही, तर ती जगभरात होते. नेतृत्व करताना विराटने आधी ज्या चुका केल्या आहेत, त्या टाळायला हव्यात. मनात कोणत्याही शंका न ठेवता नेतृत्व करावे, असा सल्लाही शोएबने विराटला दिला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.