ETV Bharat / briefs

जळगावातील कोव्हीड रुग्णालयातून संभाव्य रुग्णाचे पलायन; पोलीस यंत्रणेची उडाली तारांबळ

कोरोना संभाव्य असलेल्या रुग्णाचे स्वॅब न घेतल्यामुळे रागाच्या भरात त्याने रुग्णालयातून पलायन केल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी उघडकीस आला. यामुळे, कोव्हीड रुग्णालयाच्या गैरजबाबदारीचा आणखी एक प्रकार समोर आला असून या रुग्णाला शोधताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

जळगावातील कोव्हीड रुग्णालयातून संशयित रुग्णाचे पलायन

author img

By

Published : Jun 16, 2020, 6:34 PM IST

Updated : Jun 16, 2020, 6:45 PM IST

जळगाव - येथील कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कोरोना संभाव्य असलेल्या एका 30 वर्षीय तरुणाने त्याचे स्वॅब न घेतल्यामुळे संतापाच्या भरात रुग्णालयातून पलायन केले. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची मात्र, चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर त्या तरुणाला त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले आहे.

कोविड रुग्णालयातून पलायन करणारा कोरोना संभाव्य तरुण हा जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील इटारसी येथून ममुराबादला आलेला होता. त्याला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवल्याने तो काल (सोमवारी) सायंकाळी स्वतःहून कोव्हीड रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्याने 'आपण कोरोना पॉझिटिव्ह असून, माझे स्वॅब घ्या, मला दाखल करा', असे सांगितले होते. मात्र, त्याला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवत असताना देखील रुग्णालय प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. केवळ त्या तरुणाला रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात क्वारंटाईन करण्यात आले.

रात्रभर रुग्णालयात राहिल्यानंतरही त्याचे स्वॅब घेण्यात आले नाहीत. म्हणून मंगळवारी सकाळी त्याने पुन्हा स्वॅब घेण्याचा आग्रह धरला. परंतु, डॉक्टर्स, नर्स विनंतीकडे लक्ष देत नसल्याने त्याने संतापाच्या भरात रुग्णालयातून पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे, तो रुग्णालयातून निघून जात असताना त्याला कुणीही अडवले नाही किंवा वरिष्ठांना या प्रकाराची माहिती देण्याची तसदीही घेतली नाही. दुपारी उशिरा हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला शहाणपण सुचले. नंतर जिल्हापेठ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, या घटनेसंदर्भात रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

पोलिसांकडून लागलीच शोधाशोध -

कोव्हीड रुग्णालयातून कोरोना संभाव्य तरुण पळून गेल्याची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी ममुराबादला धाव घेतली. दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. परंतु, तो मिळून आला नाही. त्याच्या कुटुंबीयांनादेखील त्याची माहिती नव्हती. अखेर सायंकाळच्या सुमारास हा तरुण त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला घरून ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे स्वॅब घेण्यात येणार असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

Last Updated : Jun 16, 2020, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.