ETV Bharat / briefs

राष्ट्रीय डॉक्टर दिन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टरांच्या सेवा, समर्पणाला केला सलाम - Cm Thakraey thanked doctors

डॉक्टर्स दिन आपण दरवर्षी साजरा करतो, पण यंदाची ही परिस्थिती अभूतपूर्व आणि कसोटीची आहे. कोरोना विषाणू विरोधात आपण युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या आघाडीवर तुम्ही बिनीचे शिलेदार आहात, आणि रुग्ण सेवेतून कोरोना विरोधात लढत आहात, असे मुख्यमंत्री डॉक्टरांना म्हणालेत.

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 1, 2020, 6:55 PM IST

मुंबई - कोरोना विषाणुच्या युद्धातील बिनीचे शिलेदार म्हणून राज्यातील डॉक्टर योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आभार मानले आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या सेवा आणि समर्पणाला सलाम केला आहे.

भारतरत्न डॉ.बी.सी. रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टर्संना उद्देशून पत्राद्वारे संदेश दिला आहे. कोविड युद्धातील अशा डॉक्टर्संना मुख्यमंत्री महोदयांचे हे पत्र ई-मेल तसेच विविध माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

पत्रात मुख्यमंत्री म्हणतात, डॉक्टर्स दिन आपण दरवर्षी साजरा करतो, पण यंदाची ही परिस्थिती अभूतपूर्व आणि कसोटीची आहे. कोरोना विषाणू विरोधात आपण युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या आघाडीवर तुम्ही बिनीचे शिलेदार आहात आणि रुग्ण सेवेतून कोरोना विरोधात लढत आहात. सेवा बजावत असताना आपले कुटुंबीय, प्रियजनांपासून कित्येक दिवस दूर राहत असताना, इतरांच्या कुटुंबातील प्रियजन कोरोनाने हिरावले जाऊ नयेत म्हणून अहोरात्र मेहनत करत आहात. त्यामुळे कित्येकांसाठी तुम्ही देवदूत आहात. तुमचे हे योगदान येणाऱ्या कित्येक पिढ्या विसरणार नाहीत. आपण कोरोना विषाणूला हरवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तसेच तुमच्या या समर्पणामागे तुमच्या कुटुंबाचाही मोठा त्याग आहे. त्यासाठी महाराष्ट्र कृतज्ञच राहील. या कठीण काळात सेवावृत्तीने बजावलेल्या कर्तव्याची समृद्ध महाराष्ट्राच्या सोनेरी पानावर निश्चितच नोंद घेतली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.