बीजिंग - चीन आणि भारताचे सैन्य सीमारेषेवर सामान्य स्थिती करण्यासाठी पावले उचलत असल्याचे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहा जूनला बैठक झाली होती. या बैठकीत सकारात्मक सहमती झाली होती, असे चीनने म्हटले आहे.
भारताच्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याने पूर्व लडाखमधील दोन्ही देशांचे सैनिक काही भूभागावरून मागे आल्याचे मंगळवारी म्हटले होते. त्यावर चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज प्रतिक्रिया दिली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुवा चुनियिंग म्हणाल्या की, भारत आणि चीनच्या राजनैतिकसह सैन्यदलाच्या माध्यमातून परिणामकारक संवाद झाला आहे. यामध्ये सीमेबाबत सकारात्मक सहमती झाली आहे. दोन्ही देशांनी सीमेवर स्थिती सामान्य करण्यासाठी पावले उचलल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्याने सांगितले.
भारत आणि आणि चीनचे सैनिक पाच मेपासून पूर्व लडाखमधील सीमारेषेवर आमनेसामने उभे ठाकले होते.