ETV Bharat / briefs

गोंदिया : अवैध गौण खनिज उत्खनन अन् वाहतूक प्रकरणी १ कोटी १६ लाखांचा दंड - अवैध्य उत्खनन कारवाई गोंदिया

महालगाव येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून रवी बंभारे (रा. धापेवाडा) आणि अब्दुल इफतेखार जब्बार गणी (रा. लक्ष्मीनगर गोंदिया) यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर रेतीचे उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी पथकाने टिप्पर, जेसीबी जप्त करून कारवाई केली. त्यांच्याविरोधात 1 कोटी 14 लाख 33 हजार 550 रुपये दंड आकारण्यात आला.

gondia news
gondia news
author img

By

Published : Jun 15, 2020, 10:14 PM IST

गोंदिया - उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 16 लाख 80 हजार 650 रुपयांचा दंड ठोठावल्यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रेती तसेच इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक रोखण्यासाठी गोंदिया तालुक्यात पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

महालगाव येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून रवी बंभारे (रा. धापेवाडा) आणि अब्दुल इफतेखार जब्बार गणी (रा. लक्ष्मीनगर गोंदिया) यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर रेतीचे उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी पथकाने टिप्पर, जेसीबी जप्त करून कारवाई केली. त्यांच्याविरोधात 1 कोटी 14 लाख 33 हजार 550 रुपये दंड आकारण्यात आला. या प्रकरणी गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि तत्कालीन तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता नदीपात्रातील दोन्ही ठिकाणावरून रेतीचा अवैध उपसा केल्याचे आढळून आले.

याठिकाणी दोन्ही खड्ड्यातून 680.75 ब्रास रेती उपसा केल्याने दंडाचे आदेश देण्यात आले. मौजे हिवरा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इमारतीच्या बांधकामासाठी ढाकणी येथील सचिन पालांदूरकर यांनी अवैध 35 ब्रास रेती पुरवठा केल्या प्रकरणी 53 हजार 900 रुपये दंड ठोठावला आहे. कुडवा येथे लखन बहेलिया आणि आशिष नागपुरे यांनी अनिकेत बोस (रा.कुडवा) यांच्या इमारत बांधकामाकरिता अवैध पुरवठा केलेल्या 3 ब्रास रेती आणि 30 ब्रास मुरुमा पर्करणी दोघांविरुद्ध 1 लाख 93 हजार 200 रुपये दंड आकारला आहे. तीनही प्रकरणी गोंदिया उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांनी 1 कोटी 16 लाख 80 हजार 650 रुपयांच्या दंडाचे आदेश पारित केले.

ही कारवाई महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) अन्वये करण्यात आली. या कारवाईमुळे गोंदिया तालुक्यात अवैध उत्खनन व वाहतूकीस निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.