ETV Bharat / briefs

माऊली पतसंस्था अपहार प्रकरण: अध्यक्षासह संचालकावर गुन्हा दाखल - माऊली नागरी सहकारी पतसंस्था

परळीतील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेकडुन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या पैशांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी अध्यक्षासह 21 संचालक व चार कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case filed against chairman and director of Mauli Patsanstha in embezzlement case

author img

By

Published : Oct 8, 2020, 10:49 PM IST

बीड- परळी शहरातील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 39 लाख रूपयाचा अपहार करणाऱ्या अध्यक्षासह 21 संचालक व चार कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांकडुन पैसे घेऊन अफरातफर केल्याचा ठपका ठेवत परळी पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.

याबाबत सविस्तार माहिती अशी आहे की, परळी शहरात गेल्या अनेक वर्षापासून माऊली नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे, असे ग्राहकांना भासवून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. मात्र, अनेक ग्राहकांना जेव्हा पतसंस्थेतून पैसे मिळत नव्हते तेव्हा चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला.

याप्रकरणी उपनिबंधक इतेशामोद्दीन काजी यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात संजय देशमुख, कचरूलाल उपाध्याय, विजय डहाळे यांच्यासह संचालक मंडळ व 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणी परळी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणात बीडचे सामाजिक कार्यकर्ते मुकर्रमजान पठाण यांनी सातत्याने लक्ष घालून पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती पूराव्यासहित निदर्शनास आणून दिली. या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.