ETV Bharat / briefs

ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो यांची तिसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह - ब्राझील राष्ट्राध्यक्ष कोरोना

7 जुलैला ताप आणि अस्वस्थ वाटू लागल्याने बोलसोनारो यांची तपासणी करण्यात आली होती. कोरोनाचे निदान झाल्यापासून ते राष्ट्राध्यक्ष निवासस्थानातून काम पाहत आहेत. मागील आठवड्यात केलेली चाचणीही पॉझिटिव्ह आली होती.

जैर बोलसोनारो
जैर बोलसोनारो
author img

By

Published : Jul 23, 2020, 2:55 PM IST

ब्राझीलिया - ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांची तिसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 7 जुलैला त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विलगीकरणातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काल (मंगळवारी) त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने पत्रक जारी करून माहिती दिली.

‘कोरोनाची चाचणी तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली असली तरी अध्यक्ष बोलसोनारो यांनी प्रकृती ठीक आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक आहे. काल घेण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह आली,’ असे राष्ट्रध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

7 जुलैला ताप आणि अस्वस्थ वाटू लागल्याने बोलसोनारो यांची तपासणी करण्यात आली होती. कोरोनाचे निदान झाल्यापासून ते राष्ट्राध्यक्ष निवासस्थानातून काम पाहत आहेत. मागील आठवड्यात झालेली चाचणीही पॉझिटिव्ह आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.