ETV Bharat / briefs

भारत-नेपाळ सीमावाद : लिपू लेख हिमालयीन खिंडीतून चीनला जाणाऱ्या 'लिंक रोड'मुळे तणाव - India China link road news

भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गेल्या महिन्यात हिमालयीन खिंड लिपू लेख येथून भारताकडून तिबेट आणि चीनला जाणाऱ्या 80 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन झाले. हा रस्ता अत्यंत मोक्याच्या जागी असून चीन सोबतचा व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने हा मार्ग तयार करण्यात आला. मात्र, यानंतर नेपाळने या मार्गावर आक्षेप घेत तो नेपाळच्या हद्दीत असल्याचा दावा केला आहे.

इंडिया-चायना लिंक रोड न्यूज
इंडिया-चायना लिंक रोड न्यूज
author img

By

Published : Jun 10, 2020, 9:54 AM IST

काठमांडू - नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी मंगळवारी दक्षिण आशियाई शेजारी देश भारतासोबतचे तणावग्रस्त संबंध आणि सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या चर्चेसाठी नेपाळ भारताच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचे म्हटले.

असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ग्यावली यांनी नेपाळकडून अशी विनंती मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही भारताला करण्यात आली होती. आता पुन्हा मे मध्येही हीच विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

21 व्या शतकात अनोख्या प्रकारची भागीदारी करून अधिक प्रेरणादायक नातेसंबंध विकसित करणे आवश्यक आहे. आम्ही यासाठीच्या औपचारिक वाटाघाटींची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले.

भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गेल्या महिन्यात हिमालयीन खिंड लिपू लेख येथून भारताकडून तिबेट आणि चीनला जाणाऱ्या 80 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन झाले. हा रस्ता अत्यंत मोक्याच्या जागी असून चीन सोबतचा व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने हा मार्ग तयार करण्यात आला. मात्र, यानंतर नेपाळने या मार्गावर आक्षेप घेत तो नेपाळच्या हद्दीत असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान खडगा प्रसाद शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नेपाळचा एक नवीन राजकीय नकाशा जारी केला. यामध्ये सीमेवरील हा विवादित प्रदेश (लिपू लेख हिमालयीन खिंड) नेपाळमध्ये असल्याचे दर्शवले आहे.

नेपाळने ब्रिटिश राज्यकर्त्यांशी 1816 मध्ये सुगावली करार केला होता. या करारात लिम्बियाधुरा, कलापणी आणि लिपू लेख हे भाग नेपाळमध्ये असल्याचे दर्शवले होते. तसेच, नेपाळ मध्ये ब्रिटिश वसाहतवादाचे राज्य कधीच नव्हते. मात्र, 1962 मध्ये भारताच्या चीनशी झालेल्या युद्धात हा भाग भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेतला, असे भारताचे म्हणणे आहे. आजच्या घडीलाही या ठिकाणी भारतीय लष्कर तैनात असून येथे भारताचे नियंत्रण आहे. तर, भारताने हा विनाकारण अवलंबलेला आक्रमकपणा असल्याची टीका नेपाळने केली आहे.

दरम्यान, नेपाळ या प्रकरणी चर्चा करू इच्छित आहे. मात्र, भारताने देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना अशा प्रकारची राजनैतिक चर्चा करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तर, कोरोना विषाणूप्रसार राजनैतिक संवाद साधण्यात अडथळा आणत असेल तर तो या लिंक रोडच्या उद्घाटनासाठीही अडथळा ठरला असता, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री ग्यावली यांनी म्हटले आहे. या भूभागासंबंधीच्या वादामुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही बाजूंनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केवळ समस्या संपवण्याच्या औपचारिकतेसाठी नव्हे तर, दोन्ही देश एकत्रित प्रगती करू शकतील असे वातावरण तयार करण्यासाठी संवाद आणि मैत्रीपूर्ण चर्चेशिवाय पर्याय नसल्याचे ग्यावली यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.