ETV Bharat / briefs

प्रासंगिक विनोदी चित्रपटात काम करण्याची इच्छा - नीना गुप्ता - Bollywood actress

अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आपण नीना गुप्तांना पाहिलंय. आता त्यांना विनोदी भूमिका साकारायची आहे. प्रासंगिक विनोदी चित्रपटात काम करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.

नीना गुप्ता
author img

By

Published : May 14, 2019, 11:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री नीना गुप्ता यांनी गेल्या वर्षी 'बधाई हो' या चित्रपटात भूमिका केली होती. ही भूमिका त्यांच्या करियरला पुनर्जीवन देणार होती. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांना नेहमीच गंभीर भूमिका मिळत असतात. पण त्यांना आता हलक्या फुलक्या प्रासंगिक विनोदी चित्रपटामध्ये भूमिका करुन पाहायचे आहे.

'पंगा' आणि अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' या चित्रपटात नीना गुप्ता आईची भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांना कशा प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, हे विचारले असता नीना गुप्ता म्हणाल्या, ''खरंच मला कॉमेडी रोल करायचा आहे. मला मनापासून कॉमेडी करण्याची इच्छा आहे. माझ्यात चांगले कॉमिक टायमिंग आहे असे मला वाटते. मला प्रासंगिक कॉमेडी करायची आहे.''

''पूर्वीची गोष्ट वेगळी होती. तुम्ही जर कॉमेडी भूमिका केली तर तोच शिक्का तुमच्यावर पडायचा. हे मी सुध्दा भोगलंय. पण आता ते दिवस गेले. त्यामुळे मी कॉमेडी करण्यासाठी उत्साही आहे.

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या नीना गुप्ता सध्या खूप कामात व्यग्र आहेत आणि हे त्यांना आवडते.

''सध्याचा काळ माझ्यासाठी सर्वात बिझी काळ आहे. मला चांगल्या ऑफर येत आहेत आणि चांगल्या कथांचा मी हिस्सा बनत आहे. मी जे करायचे ठरवले होते..म्हणजे दिग्दर्शन वगैरे ते मी नंतर करेन पण,...त्याहून मी अभिनय सध्या जास्त एन्जॉय करीत आहे माझे लक्ष मी अभिनयावर केंद्रीत केले आहे.''

नीना गुप्ता सध्या 'सुर्यवंशी' आणि 'ग्वाल्हेर' चित्रपटात काम करीत आहेत. त्या मुलगी फॅशन डिझायनर मसबा गुप्तासाठी भरपूर वेळ देतात. मुलगीच आपली मैत्रीण असल्याचे पुढे त्यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.