अमरावती - राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतीच्या खरीप हंगामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे पेरणीसाठी मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणांची विक्री हेत आहे. या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, आज (सोमवार) अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे पेट्रोलिंग दरम्यान तब्बल 9 लाख रुपयांचे बोगस बियाणे पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
देवगाव फाटा येथून एका वाहनामध्ये बोगस बियाणे असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी केली असता या वाहनामध्ये 9 पोती बोगस बियाणे सापडले. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रक कृषी अधिकारी यांच्याकडून तपासणी करून या प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे.