ETV Bharat / briefs

अमेठीतील विजयासाठी स्मृती इराणींनी केला होता नवस, १४ किमी चालत आल्या सिध्दीविनायकाला

खासदार झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी १४ किमी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत निर्मात्या एकता कपूर होत्या. अमेठी लोकसभा मतदार संघातून विजय मिळावा यासाठी त्यांनी नवस केल्याचे बोलले जात आहे.

स्मृती इराणी
author img

By

Published : May 29, 2019, 11:57 AM IST

Updated : May 29, 2019, 1:53 PM IST

मुंबई - अमेठी मतदार संघातून राहुल गांधींना पराभूत करण्याचा संकल्प केलेल्या स्मृती इराणी यांनी सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. आपल्याला विजय मिळावा यासाठी त्यांनी सिद्दीविनायकाला नवस केला होता. नवसपूर्तीसाठी दादरच्या मंदिरापर्यंत अनेक भाविक अनवानी पायांनी चालत येऊन सिद्दीविनायकाचे दर्शन घेतात. स्मृती इराणी यांनीदेखील १४ कि.मी. अनवानी चालत पोहोचून दर्शन घेतले आणि नवस फेडले.

स्मृती इराणी सिद्दीविनायक दर्शन

स्मृती इराणी यांनी यांच्यासोबत बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर होत्या. एकताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये स्मृती इराणी दर्शनाहून परत जातानाचा अनुभव सांगत आहेत. तसेच दर्शन घेत असतानाचे काही फोटोदेखील पोस्ट करण्यात आलेत.

स्मृती इराणी लोकसभेवर प्रथमच निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या चांदणी चौक लोकसभा मतदार संघातून भजपच्या वतीने २००४ मध्ये निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसच्या कपील सिब्बल यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर २०११ मध्ये इराणी यांना गुजरातमधून राज्य सभेवर खासदार म्हणून निवडण्यात आले. २०१४ मध्ये त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळी त्यांना पडलेली मते लक्षणीय होती. अमेठीशी त्यांनी गेली पाच वर्षे संपर्क ठेवला होता. दरम्यान केंद्रात त्यांना महत्त्वाची मंत्रीपदे मिळाली असल्यामुळे त्या वलयाचा लाभदेखील अमेठीत होत होता. २०१९ मध्ये झालेल्या अमेठी लोकसभा निवडणूकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करुन इतिहास घडवला. अपवाद वगळता अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. इथून संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी मळवलेला विजय विशेष उल्लेखनीय आहे.

Intro: स्मृती इराणी यांनी मुंबईत अनवाणी पायाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

भाजपा खासदार स्मृति ईरानी यानी सोमवारी रात्री 14 किमी अनवाणी चालत जाऊन दादर च्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या सोबत एकता कपूर ही होत्या.एकता कपूर यांनी या बाबतचा एक व्हिडिओ एकता कपूर द्वारे सोशल मिडियात टाकण्यात आला आहे.याच बरोबर सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत.

तसेच दर्शन झाल्यावर देखील कार मधून जातानाच व्हिडीओ टाकण्यात आला आहे.यात आमचा नवस पूर्ण झाला असे ते म्हणत आहेत.तसेच दुसऱ्या व्हिडिओत स्मृती इराणी या चालत अनवाणी आल्याचने आश्चर्य लोक व्यक्त करीत आहे.Body:।तConclusion:।
Last Updated : May 29, 2019, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.