ETV Bharat / briefs

काल-परवाच तुला हळद लागली, आताच पिवळा होऊ नको - अरविंद सावंत यांची पडळकरांवर टीका

author img

By

Published : Jun 24, 2020, 5:58 PM IST

एका मोठ्या नेत्याविषयी कोणत्या पातळीला तुम्ही जाता आणि वैयक्तिक कोणते शब्द वापरता, त्याची निंदा करावी तितकी थोडी आहे. भाजपमधील शाबूत नेत्यांनी पडळकर यांना समज द्यावी, असे सावंत म्हणाले.

MLA Arvind Sawant comment padalkar
MLA Arvind Sawant comment padalkar

मुंबई - बारामतीत निवडणूक लढवली म्हणजे आपण स्वर्गाला बोट लावले, अस समजू नये. महाराष्ट्राच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेली वैयक्तिक टीकाही निंदनीय आहे. काल परवाच तुला हळद लागली, आताच पिवळा होऊ नको, असा खोचक सल्ला शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

एका मोठ्या नेत्याविषयी कोणत्या पातळीला तुम्ही जाता आणि वैयक्तिक कोणते शब्द वापरता, त्याचा निषेध करावा तितकी थोडी आहे. भाजपामधील शाबूत नेत्यांनी पडळकर यांना समज द्यावी, असेही सावंत म्हणाले. एखाद्या नेत्याविषयी राजकीय मतभिन्नता असू शकतात. पूर्वी आमच्यातही असायचे. इतक्या मोठ्या नेत्याबाबत कोणते शब्द वापरावेत, याबाबत तारतम्य भाजपाला राहिले नसल्याचे अरविंद सावंत म्हणाले.

शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली. शरद पवार हे या महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर सावंत यांनी पडळकरांना धारेवर धरले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.