मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभय देओल सोबत काम करण्याचा अनुभव चांगला नसल्याचे बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यप याने म्ह्टले आहे. एका मुलाखती दरम्यान अनुरागने अभिनेता अभय देओल सोबतच्या कामाचा त्याच्या कामाचा अनुभव सांगितला आहे.
अभिनेता अभय देओलने इम्तियाज अलीच्या सोचा ना था या चित्रपटाद्वारे 2005 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. ज्यानंतर अभयने काही चित्रपटांमध्ये आपली उत्कृष्ट अभिनय केला. ज्यामध्ये 'देव डी' आणि 'ओये लकी लकी ओए' या चित्रपटांचा देखील समावेश आहे.
‘देव डी’ या चित्रपटात अभयने अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली काम केले होते. हा चित्रपट लोकांना खूप आवडला. पण अनुराग कश्यपच्या मते अभयबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव चांगला नव्हता.
अनुराग म्हणाला की, अभय बरोबर काम करणे खरोखर कठीण होते. त्याच्याबरोबर काम करण्याच्या माझ्या आठवणी चांगल्या नाहीत. देव डी या चित्रपटाच्या शूटिंगनंतर मी त्याच्याशी कधीच जास्त बोललो नाही, असे अनुराग म्हणाला.
अनुराग म्हणतो की, चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अभय गोंधळून गेलेला होता. त्याला कलात्मक चित्रपट करायचे होते, पण त्याला मुख्य प्रवाहातील फायदे देखील हवे होत. अभय चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी पंचतारांकीत हॉटेलमध्ये रहायचा. अगदी कमी बजेटचा चित्रपट असल्याने संपूर्ण चित्रपटाची टीम पहाडगंज येथे राहत होती. याच कारमामुळे त्याच्याबरोबर काम करणारे बहुतेक दिग्दर्शकांनी त्याच्यापासून फारकत घेतली.
त्याचवेळी अनुरागने हे देखील सांगितले की, चित्रपटाच्या प्रमोशन वेळी जिथे अभयची गरज होती तेथे तो नसायचा, असे अनुराग सांगतो. त्याने 'देव डी' चे अजिबात प्रमोशन केले नाही. त्याने चित्रपटाचा आणि चित्रपटाच्या टीमचा अपमान केला. बहुधा तो भावनिक आणि वैयक्तिकरित्या झगडत होता. जे त्याने कधीही सांगितले नव्हते. त्याला असे वाटते की, मी त्याची फसवणूक केली आहे. म्हणून तो माझ्याशी कधीच बोलला नाही. असे असले तरीही अनुराग अभयला एक उत्कृष्ठ अभिनेता असल्याचे सांगतो.
अभय देओल व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी, माही गिल आणि कल्की कोचलीन यांनी 'देव डी' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 2000 साली आलेल्या देवदास या चित्रपटाची ही आधुनिक आवृत्ती होती.