ETV Bharat / briefs

कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही- अजित पवार

कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

author img

By

Published : Jul 18, 2020, 3:49 PM IST

Deputy chief minister Ajit pawar
Deputy chief minister Ajit pawar

पुणे- कोरोना विषाणूचा संसर्ग बारामती तालुक्यातही वाढत आहे. तालुक्यात कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा. तसेच या कामामध्ये कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

तसेच, संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. बारामती शहरातील खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घेण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे. त्याच धर्तीवर बारामती तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांबरोबरच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीद्वारे नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसूत्रता येईल. कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही पवार यांनी दिले.

यावेळी बैठकीत बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग धोडपकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रुग्णालय रुईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, जि.प. चे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.