ETV Bharat / briefs

नागपूर: शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स'

author img

By

Published : Jul 19, 2020, 10:29 PM IST

प्रत्येक व्यापाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रशासनाच्या नियमांमुळे घरी बसावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून प्रत्येक व्यापारी असोसिएशन एक टास्क फोर्स तयार करेल. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यापासून मास्क लावण्याच्या सूचना देण्याचे कार्य ही टास्क फोर्स करेल, असे मुंढे म्हणाले.

Nagpur mnc meet
Nagpur mnc meet

नागपूर- कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत नागपूर कोरोनामुक्त करुया, असे आवाहन केले आहे.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या वाढली. सध्या बाजार हे गर्दीचे ठिकाण असून तेथील गर्दी कशी नियंत्रित करायची, यासंदर्भात चर्चा करण्याकरिता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात विविध व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, यांच्यासह नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, 31 मे पर्यंत नागपुरात कोविड रुग्णांची संख्या 400 च्या जवळपास होती. मात्र, केवळ दीड महिन्यात 2 हजार 400 ने आकडा वाढला. सद्या बाधितांची संख्या 2 हजार 800 च्या घरात आहे. मृत्यू संख्याही 13 वरून 47 वर पोहोचली. यामागील सर्वात मोठे कारण नियमांचे पालन करण्याचे बंधन असतानाही ते पाळले जात नाही हे आहे. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणजे बाजार आहे. बाजारातही नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. सम-विषम तारखेचा नियम असतानाही त्याचे उल्लंघन केले जात आहे, दुकानात क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक येणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सर्व बाबींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.

मुंढे पुढे म्हणाले की, यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेणे आवश्यक आहे. किमान स्वत:च्या दुकानासाठी व्यापाऱ्यांनी नियम पाळायला आणि दुकानात येणाऱ्यांना नियम पाळण्याबाबत सांगितले तरी कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होवू शकते. पर्यायाने लॉकडाऊन नव्याने लावण्याची गरज पडणार नाही. यासाठी व्यापाऱ्यांच्या सर्वच असोसिएशनचा पुढाकार घेऊन आजपासूनच स्वयंशिस्त पाळण्यासोबत येणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच, बहुतांश दुकानदार नियमांचे पालन करतात, परंतु जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यास व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठींबा दिला आहे, असे मुंढे म्हणाले.

यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडतानाच अतिशय चांगल्या सूचनाही केल्या आहेत. यापुढे आम्ही प्रत्येक व्यापारी कोविड 19 च्या नियंत्रणासाठी ‘कोविड अँबेसेडर’ म्हणून कार्य करण्यास तयार असल्याचे व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रत्येक व्यापाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रशासनाच्या नियमांमुळे घरी बसावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून प्रत्येक व्यापारी असोसिएशन एक टास्क फोर्स तयार करेल. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यापासून मास्क लावण्याच्या सूचना देण्याचे कार्य ही टास्क फोर्स करेल, असे मुंढे म्हणाले.

त्याचबरोबर, बाजार परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा मनपाच्या सहकार्याने कार्य करणार आहे. जनजागृतीचे फलक असोसिएनशनतर्फे लावण्याची सूचना करण्यात आली आहे. या सर्व सूचनांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वागत करीत मनपाच्या वतीने या कार्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.