अमरावती- जन्मदात्या बापाने त्याच्या अल्पवयीन मुलीवर सलग 4 महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच जिल्ह्यातील वरूड शहरात खळबळ उडाली आहे. बापासह शेजारच्या व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
गत 4 महिन्यांपासून 14 वर्षाची युवती वडिलांकडून केला जाणारा अत्याचार सहन करत होती. वडिलांप्रमाणेच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेही या युवतीवर अत्याचार केला आणि या प्रकाराची माहिती कुठे सांगितल्यास जिवे मारून टाकण्याची धमकीही दिली. दरम्यान चार महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या प्रकाराची माहिती पीडित युवतीने तिच्या आत्त्याला सांगितली.
हा धक्कादायक प्रकार समजताच पीडितेच्या आत्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने तडख वरुड पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणात पीडितेचा नराधम बाप शिवू सल्लू गुबाळे (43) विरुद्ध पोस्कोसह इतर कलामांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.