ETV Bharat / briefs

बीड जिल्ह्यात मित्राच्या पत्नीवर केला तीन वर्षे बलात्कार, ८.५ लाख रुपयेही हडपले - Parli vaijnath repeat news

पतीच्या मित्राची घरी ये-जा होती. त्यातून त्याने त्याच्या बायकोचा विश्वास संपादन केला. त्यातून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर धमकी देऊन साडेआठ लाख रुपये हडपले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Beed
Beed
author img

By

Published : Apr 11, 2021, 6:27 PM IST

Updated : Apr 16, 2021, 12:26 PM IST

परळी वैजनाथ - मित्रानेच मित्राच्या पत्नीवर तीन वर्षे अत्याचार केला. शिवाय, साडेआठ लाख रुपये उकळले. ही खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील परळीत गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी परळी शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी फरार आहे.

घरी ये-जा झाल्याने वाढली जवळीक

पोलिसांच्या माहितीनुसार, परळीत पीडित ३३ वर्षीय महिला कुटुंबीयासह राहते. पतीचा मित्र नेहमी घरी ये-जा करत असे. यातून संबंधित पीडितेची पतीच्या मित्राशी ओळख झाली. त्याने महिलेला धमकावून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जवळपास तीन वर्षे त्याने शारीरिक संबंध ठेवले. यासाठी तिला तो धमकावत होता. कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देत होता.

विश्वासाने दिला धोका

शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर विश्वास संपादन करुन त्याने आठ लाख रुपये व साठ हजार रुपये किमतीच्या दोन तोळ्याच्या अंगठ्या, असा एकूण आठ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज हडपला. ते परत मागितल्यावर आरोपीने पीडितेला काठीने मारहाण करुन धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन अर्जुन बाबूराव मुंडे (रा.वडवणी ताग़ंगाखेड जि.परभणी) याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

सध्या आरोपी फरार आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अशोक खरात हे करत आहेत.

Last Updated : Apr 16, 2021, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.