ETV Bharat / briefs

शिर्डीत कोरोनाचा पहिला बळी.. एका व्यापाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

author img

By

Published : Jul 19, 2020, 5:09 PM IST

मृत व्यक्तीच्या परिवारातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली होती. व्यक्तीचे वय अधिक असल्याने, तसेच इतर व्याधीमुळे खबरदारी घेत त्यांना नगर येथील नोबल हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

Shirdi Nagar Panchayat
Shirdi Nagar Panchayat

अहमदनगर- शिर्डीतील पूजा साहित्य मिळविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका दुकानाच्या मालकाला कोरोनाची लागण झाली होती. ते गेल्या काही दिवसांपासून नगर येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शिर्डीतील हा कोरोनाचा पहिला बळी आहे.

मृत व्यक्तीच्या परिवारातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली होती. व्यक्तीचे वय अधिक असल्याने, तसेच इतर व्याधीमुळे खबरदारी घेत त्यांना नगर येथील नोबल हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास कोरोना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.