ETV Bharat / briefs

अर्जुनी-मोरगाव तालुक्यात 20 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू - Farmer drowned in canal chincholi

गावकऱ्यांनी कालव्यात रत्नदीपचा शोध सुरू केला व पोलिसांना माहिती दिली. पोलीस रत्नदीपचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप त्याचा मृतदेह सापडला नाही.

Canal gondia
Canal gondia
author img

By

Published : Jul 19, 2020, 4:00 PM IST

गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या चिचोली-जुनी येथील 20 वर्षीय तरुण शेतकरी रत्नदीप बोरकरचा इटियाडोहच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काल (18जुलै) सकाळच्या सुमारास घडली.

सध्या शेतांमध्ये खरीप धानाची लागवड सुरू आहे. मात्र पेरणीसाठी शेतात पाणी नसल्याने रत्नदीपच्या वडिलांनी त्यास कालव्यावर जाऊन पाणी पंपात काय समस्या हे बघण्यास सांगितले. त्यानंतर रत्नदीप काल सकाळी तिबेट वसाहतीलगतच्या इटियडोह कालव्यावर पोहोचला. पंपा जवळ गवत आणि केर कचरा जमा असल्याचे दिसून आल्याने त्या ठिकाणी सफाई करण्याच्या उद्देशाने तो कालव्यात उतरत होता, दरम्यान त्याचा तोल गेला व तो कालव्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी कालव्यात रत्नदीपचा शोध सुरू केला व पोलिसांना माहिती दिली. पोलीस रत्नदीपचा शोध घेत आहे, मात्र अद्याप त्याचा मृतदेह सापडला नाही. गोठनगाव धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद केल्या नंतरच मृतदेहाचा शोध लागू शकेल. त्यामुळे, पाण्याचा विसर्ग बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाला या घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.