ETV Bharat / briefs

अर्जुनी-मोरगाव तालुक्यात 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

आज दीक्षाची आई आणि मोठी बहीण नेहमी प्रमाणे शेतीच्या कामासाठी बाहेर गेल्या होत्या. तर मोठा भाऊ बाहेरगावी गेला होता. भाऊ घरी परतला असता त्याला दीक्षा ही गळफास घेतलेली दिसून आली. हे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. त्याने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

Gondia girl suicide
Gondia girl suicide
author img

By

Published : Jul 23, 2020, 8:37 PM IST

गोंदिया- जिल्ह्यतील अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या एरंडी देवी येथील एका 13 वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. दीक्षा अर्जुन मेश्राम असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

आज दीक्षाची आई आणि मोठी बहीण नेहमी प्रमाणे शेतीच्या कामासाठी बाहेर गेल्या होत्या. तर मोठा भाऊ बाहेरगावी गेला होता. भाऊ घरी परतला असता त्याला दीक्षा ही गळफास घेतलेली दिसून आली. हे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. त्याने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. याबाबत अर्जुनी मोरगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव तोदले हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहास उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथे पाठविले.

दरम्यान, दीक्षाने गळफास का घेतला, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोदले यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.