यवतमाळ - जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जे रुग्ण यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात 841 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 910 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 20 बाधितांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 16, खासगी कोरोना रुग्णालयात दोन आणि डीसीएचसीमधील दोन मृत्यूंचा समावेश आहे. तर एक मृत्यू बाहेर जिल्ह्यातील आहे.
6718 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह -
शनिवारी एकूण 7559 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 841 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर 6,718 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7,205 सक्रिय रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2,685 तर गृह विलगीकरणात 4,520 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 61,805 झाली आहे. 24 तासांत 910 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 53,142 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,458 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 13.12, तर मृत्युदर 2.36 आहे.
रुग्णालयात 763 बेड उपलब्ध -
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 29 खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण 763 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 365 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 212 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 172 रुग्णांसाठी उपयोगात, 188 बेड शिल्लक आणि 29 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 701 उपयोगात तर 363 बेड शिल्लक आहेत.