ETV Bharat / briefs

ठाणे: मीरा भाईंदरमध्ये आज 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर 105 जण कोरोनाबाधित

author img

By

Published : Jul 14, 2020, 10:22 PM IST

सध्या 1 हजार 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज मिरारोड परिसरात 67 तर भाईंदर पूर्व भागात 21 आणि भाईंदर पश्चिममध्ये 17 रुग्ण, असे एकूण 105 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे, अशी माहिती मीरा भाईंदर जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून देण्यात आली.

Covid 19 hospital thane
Covid 19 hospital thane

ठाणे- मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे, तर मृत्यू संख्या देखील वाढत आहे. आज मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या 8 रुग्णांवर कोविड 19 रुग्णालयात उपचार सुरू होते. काल ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि आज त्यात ८ रुग्णांची भर पडल्याने मीरा भाईंदरमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 207 झाली आहे.

मीरा भाईंदर शहरात आज 105 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. या सर्व रुग्णांचा कोविड 19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुगणांची संख्या जास्त आहे. तर तीव्र लक्षणे असलेल्यांची संख्या कमी आहे.

तसेच, मीरा भाईंदरमध्ये कोरोनाबधितांची एकूण संख्या 5 हजार 851 झाली आहे. तर आज 146 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 4 हजार 424 जण कोरोनामुक्त झाले असून 1 हजार 219 जणांचे कोविड अहवाल प्रतिक्षेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.