ETV Bharat / briefs

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ७१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू - kalyan dombivali corona update

कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यात गेल्या 24 तासात नव्याने 71 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोनाच्या रूग्ण संख्येने 1 हजारांचा टप्पा पार केला आहे.

thane corona news
71 news corona patients at kalyan dombivali
author img

By

Published : Jun 2, 2020, 7:39 PM IST

ठाणे - गेल्या 24 तासांमध्ये कल्याण डोंबिवलीत नव्याने ७१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यासंदर्भातली माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर आज (मंगळवार) वाढ झालेल्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

त्यापैकी एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर डोंबिवली पश्चिम परिसरातही एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद पाहता दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजारांच्या पार झाला आहे. तर आतापर्यंत ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकीकडे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना 365 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत 668 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ८ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर आजही रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण कल्याण पूर्वेत चाळीत राहणारे रुग्ण असून आज 71 रुग्णांपैकी 21 कोरोनाबाधित रुग्ण या भागातील आहेत. डोंबीवली परिसरात 23 रुग्ण आढळून आले. तर कल्याण पश्चिम परिसरातही 19 रुग्ण आढळून आले. मात्र, डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्क येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.