ETV Bharat / briefs

धक्कादायक..! कोल्हापुरात 12 तासात 6 जणांचा कोरोनाने मृत्यू; एकूण संख्या 32 वर

कोल्हापुरात गेल्या 12 तासात तब्बल 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Corona kolhaour
Corona kolhaour
author img

By

Published : Jul 14, 2020, 6:32 PM IST

कोल्हापूर- एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर राज्यामध्ये सर्वात कमी आहे. मात्र त्याच कोल्हापुरात आता मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. कोल्हापुरात गेल्या 12 तासात तब्बल 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

12 तासांत 6 मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणासुद्धा हादरून गेली आहे. आणखी 6 जणांच्या मृत्यूनंतर एकूण मृत्यूंची संख्या आता 32 वर पोहोचली आहे. शिवाय रात्रीपासून आणखी 22 कोरोना रुग्णांचीसुद्धा वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 331 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 859 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 440 वर पोहोचली आहे.

काल रात्रीपासून एकूण 492 जणांच्या स्वॅबचे अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 425 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून 45 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान मृतांमध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधील 60 वर्षांची महिला, नेज शिवपुरीमधील 65 वर्षांची महिला, इचलकरंजीमधील 60 वर्षांची महिला, तारदाळमधील 83 वर्षांचा वृद्ध, तर कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरातील 83 वर्षांच्या वृद्धासह शिरोळ तालुक्यातील जैनापूर गावातील 46 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 96

भुदरगड- 80

चंदगड- 154

गडहिंग्लज- 132

गगनबावडा- 7

हातकणंगले- 30

कागल- 59

करवीर- 83

पन्हाळा- 50

राधानगरी- 75

शाहूवाडी- 192

शिरोळ- 27

नगरपरिषद क्षेत्र- 189

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-127

असे एकूण- 1301

इतर जिल्हा व राज्यातील 30 असे मिळून एकूण 1 हजार 331 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.