रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच आहे . मागील 24 तासात जिल्ह्यात 588 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 304 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 284 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 588 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 22 हजार 283 झाली आहे. तसेेेच शुक्रवारी 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
शुक्रवारी 588 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह -
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित होत आहेत. शुक्रवारी नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 588 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 22 हजार 283 जाऊन पोहोचली आहे. या 588 रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 167, दापोली 50, खेड 44, गुहागर 91, चिपळूण 88, संगमेश्वर 54, मंडणगड 6, राजापूर 54 आणि लांजा तालुक्यात 34 रुग्ण सापडले आहेत.
16 जणांचा मृत्यू -
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 656 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.94% आहे. दरम्यान, शुक्रवारी 1130 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,27,896 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.