ETV Bharat / briefs

राज्यात 50 टक्के तर मुंबई शहरात 73 टक्के ई-पास फेटाळल्या - 50 टक्के ई पास रद्द बातमी मुंबई

कोरोना संक्रमणासाठी 22 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासावर, येण्या-जाण्यावर बंधने आली आहेत.

Maharashtra police
महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : May 7, 2021, 2:01 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई सह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडॉऊनचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता कुठल्याही अस्थापना किंवा इतर गोष्टींना शासनाकडून मज्जाव केला आलेला आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्याचं पाहून राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी आंतर जिल्हा प्रवासासाठी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास ची सुविधा देण्यात आली होती. मात्र, या सुविधेमध्ये योग्य कारण न देता आल्यामुळे राज्यभरात तब्बल 50 टक्क्यांहून अधिक ई-पास रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबई शहरात याचे प्रमाण 73 टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना संक्रमणासाठी 22 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासावर, येण्या-जाण्यावर बंधने आली आहेत. अत्यावश्यक कारणासाठी जर आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास सुविधा राज्य पोलिसांकडून देण्यात आलेली होती. ज्याच्या अंतर्गत तब्बल 6 लाख 82 हजार 360 अर्ज महाराष्ट्र पोलिसांकडे आले होते. ज्यामधील तब्बल 3 लाख 6854 अर्जदारांना पास देण्यात आले असून 3 लाख 62 हजार 720 अर्ज हे योग्य कारण न दिल्यामुळे रद्द करण्यात आलेले आहेत.

आर्थिक राजधानी मुंबई शहरातील परिस्थिती पाहता आतापर्यंत मुंबई पोलिसांकडे तब्बल 44,158 ई-पास अर्ज आले होते. यादरम्यान, तब्बल 32,324 अर्ज मुंबई पोलिसांकडून रद्द करण्यात आले आहेत. तर 11,300 अर्जदारांना ई-पास सुविधा देण्यात आलेली आहे.

देशाची आर्थिक मुंबईसह राज्यभरातमध्ये ई-पाससाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात फेटाळण्यात येण्याचे मुख्य कारण म्हणजे अर्जदारांकडून आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी योग्य कारण दिले जात नाही. जे कारण अर्जदारांकडून दिले जाते ते अत्यावश्यक गोष्टीत मोडत नसल्यामुळे सदरचे अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर दुसरे कारण म्हणजे अर्जदारांकडून जे कारण देण्यात येतात त्याचे कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड केले जात नाहीत. ज्या कारणामुळे हे ई-पास अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे पोलीस खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.