ETV Bharat / briefs

सोलापूर जिल्ह्यात 5 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

author img

By

Published : Jul 16, 2020, 8:24 PM IST

आजपर्यंत अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टची सुरुवात करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये टेस्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रॅपिड टेस्टमुळे कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींचे झटपट अलगीकरण करणे, त्यांच्यावर उपचाराची सुरुवात करणे शक्य झाले आहे.

Rapid antigen test
Rapid antigen test

सोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. येत्या दहा दिवसात या टेस्ट करण्याचे नियोजन असून आतापर्यंत जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात अँटिजेन टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या टेस्टमुळे अर्ध्या तासातच कोरोनाची लागण झाली किंवा नाही, याची माहिती मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील 11 तालुक्यात येत्या 10 दिवसात अँटिजेन टेस्टची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

आजपर्यंत अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टची सुरुवात करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये टेस्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रॅपिड टेस्टमुळे कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींचे झटपट अलगीकरण करणे, त्यांच्यावर उपचाराची सुरुवात करणे शक्य झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 861 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये अक्कलकोट येथे 90, बार्शी येथे 257, माळशिरस येथे 32, पंढरपूर येथे 161, उत्तर सोलापूर येथे 87, दक्षिण सोलापूर येथे 234 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.