ETV Bharat / briefs

सातारा जिल्ह्यात 46 कोरोनाबाधित, तर तिघांचा मृत्यू - 46 corona positive Satara

साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष व कृष्णा रुग्णालय कराड येथे पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जावली तालुक्यातील पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुषाला उपचाराकरिता क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Krantisingh Nana Patil district hospital

author img

By

Published : Jul 8, 2020, 6:03 PM IST

सातारा- जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर, जावली तालुक्यातील कुसुंबी, पुनवडी व पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कोरोनाबाधितांमध्ये निकट सहवासातील 39, प्रवास करून आलेले 4, सारीचे व आयएलआय 3, अशा रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांमध्ये पाटण तालुक्यातील गोकुळ, कोयना नगर, कामरगाव, दबाचामाळ, कडवे बुद्रुक, सडादाढोली. माणमधील म्हसवड, दोरगेवाडी, इंजबाव, मार्डी, गोंदवले बुद्रुक येथील नागरिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, कराड तालुक्यातील तारुख, कोटीवले, शामगाव, सुपणे. सातारा तालुक्यातील जिहे, खावली, भरतगाव, गोजेगाव, कण्हेर, शिवाजीनगर, सातारा. वाई तालुक्यातील केंजळ व पसरणी. जावळीतील पुणवडी व कास या गावांमधील नागरिकांचाही समावेश आहे.

दरम्यान, खासगी प्रयोग शाळेत तपासणी करून कोरोनाबाधित आढळलेला 28 वर्षीय पुरुष काल रात्री उशिरा मुंबई येथून प्रवास करून साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल झाला आहे. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांचा आकडा 498 झाला असून एकूण बाधितांची संख्या 1 हजार 418 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 61 झाला आहे.

तीन बाधितांचा मृत्यू

साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष व कृष्णा रुग्णालय कराड येथे पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जावली तालुक्यातील पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुषाला उपचाराकरिता क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान घेण्यात आलेल्या नामुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.