सातारा- जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये निकट सहवासातील 35, प्रवास करून आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण 43 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती, माण तालुक्यातील कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75 व 42 वर्षीय महिला व 17, 15, 22, 53 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
तसेच, फलटण तालुक्यातील आंदरूड येथील 52 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील करहर येथील 52 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15, 19, 70, 26, 23 वर्षीय महिला व 12, 48, 58, 60, 27 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19, 47 वर्षीय पुरुष व 62, 60 वर्षीय महिला, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, सातारा येथील भंडारी प्लाझा गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळ पेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.
घेतलेले एकूण नमुने-14330
एकूण बाधित- 1189
घरी सोडण्यात आलेले रुग्ण- 779
मृत्यू -50
उपचारार्थ रुग्ण -361