ETV Bharat / briefs

नशिक जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 357 नवे कोरोना रुग्ण; 10 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत 42 हजार 984 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 29 हजार 696 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 12 हजार 519 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नाशिक कोरोना
नाशिक कोरोना
author img

By

Published : Jul 28, 2020, 11:51 AM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून (27 जुलै) मागील 24 तासात जिल्ह्यात 357 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या आता 12 हजार 519 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 467 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात 263 जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 9 हजार 402 जण कोरोनामुक्त झाले आहेत .

नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत 42 हजार 984 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 29 हजार 696 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 12 हजार 519 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 75.10 टक्के म्हणजे 9 हजार 402 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 467 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत 2 हजार 650 पॉझिटिव्ह रुग्णांवर नाशिक जिल्ह्याच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र कमी झाली

कोरोना काळात नाशिक शहरात आतापर्यंत एकूण 1049 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले गेले होते. मात्र ह्या भागात मागील 14 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही म्हणून 783 प्रतिबंधित क्षेत्र रद्द करण्यात आली असून सद्यस्थितीत नाशिक शहरात 266 प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत आहेत.

मृतांची संख्या

नाशिक ग्रामीण 111
नाशिक मनपा 253
मालेगाव मनपा 84
जिल्हा बाह्य 19

एकूण नाशिक जिल्ह्यात 467

नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थित

नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण 12519
कोरोनामुक्त - 9402
एकूण मृत्यू -467

एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-2650

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.